कधी कवीमन सुद्धा जागं होते...

यातल्या एकही कविता मी लिहिलेल्या नाहीत...

Sunday, 12 June 2011

शब्द

शब्द


व्यर्थ उतारा मनाचा करायचा नाही
अर्थ प्रेमाचा कधीच कळायचा नाही

दिले काय नि घेतले काय ह्याचा
हिशोब प्रेमात लावायचा नाही ..

आठवण माझी कधी येते का तिला
हा प्रश्न हि आता विचारायचा नाही …

आठवणीत झुरणे , एकटेच हसणे
खूळयांना हा छंद कळायचा नाही

प्रत्येक श्वास माझा माळला तिला मी
निश्वास हि परत मला मागायचा नाही

मागतो कुठे काही लक्षात आणून देतो
दिलेला ‘शब्द’ तिला आठवायचा नाही ..!!

Posted by Unknown at 03:03
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

No comments:

Post a Comment

Newer Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

Followers

Blog Archive

  • ▼  2011 (5)
    • ▼  June (5)
      • सागं आठवण आली की काय करायचे?
      • लाजून हासणे अन्‌ हासून ते पहाणे
      • मी बरसलो आज शब्दांतुन , तीला एकही शब्द ना कळला कधी
      • नाव बुडण्याआधी किनारा पाहून घे
      • शब्द

About Me

Unknown
View my complete profile
Simple theme. Powered by Blogger.